Saturday, November 24, 2007

असाही विचार करणारा आपल्यातला एक..

प्रशांत कांबळे, अमेरिका [ Friday, June 22, 2007 06:05:56 am]

कुणीही स्वेच्छेने किंवा आनंदाने आपल्या लोकांपासून दूर राहाणे पसंत करत नाही. प्रत्येकाच्या काहीतरी अडचणी असतात म्हणूनच आम्ही आपला देश सोडून जातो. अमेरिकेत येण्यापूर्वी मी कामाच्या निमित्ताने पाच वर्षे पुण्यात राहिलो होतो. अमेरिकेतली मराठी माणसे पुणेकरांपेक्षा मराठी संस्कृतीशी अधिक जोडलेली आहेत, असे मला वाटते. मी मूळ यवतमाळ जिल्ह्यातल्या बोरीसिंह या छोट्याशा गावात राहणारा. पूवीर् आमच्या विदर्भात थोडी शेतजमीन असणारा शेतकरीही खाऊन पिऊन सुखी असायचा. आता शेती हा गरिबी आणि वेठबिगारीसाठी समानाथीर् शब्द बनला आहे. शेतकरी कर्जाने मरतो आहे. कर्ज किती, तर दहा हजार रुपयांपेक्षाही कमी म्हणजे फक्त २६० अमेरिकन डॉलर. दहा हजारांसाठी माणसे मरत असताना मुंबईचे शांघाय बनवण्याच्या गमजा मारणे निव्वळ मूर्खपणा आहे. त्यापेक्षा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे नाही का? मी अमेरिकेत मायक्रोसॉफ्ट कॉपोर्रेशनमध्ये इंजीनिअर आहे. माझ्या पन्नासेक मित्रांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दर महिन्याला १० डॉलर जमा करण्याचे ठरवले आहे. म्हणजे साधारणपणे ५०० डॉलर होतील. तेवढाच हातभार आमची कंपनी लावणार आहे. त्यामुळे दर महिन्याला ४० हजारांची मदत उभी राहिल आणि महिन्याला किमान चार शेतकऱ्यांची कर्जे फेडता येतील. आमच्या या उपक्रमात अनेकजण जोडत आहेत.